loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी प्रभाग ३ मधून राजन शेट्ये व प्रिती सुर्वे यांना विजयी करण्याचे आवाहन

रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी नगर पालिका प्रभाग ३ मधून ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये व प्रिती सुर्वे हे महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे दोन्ही उमेदवार अनुभवी व कर्तबगार असून त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात मोठी आघाडी संपादन केली असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी सांगितले. राजन शेट्ये यांनी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष पद भुषविले आहे. एक अभ्यासू व सचोटीचे नेते म्हणून ते ओळखले जातात. अतिशय सौजन्यशील स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. रत्नागिरी न.प.मधील ते सर्वात ज्येष्ठ नगरसेवक म्हणून सुपरिचित आहेत. जनतेची लहान मोठी कामे ते तत्परतेने करीत असतात. तसेच रत्नागिरी प्रभाग ३ मध्ये त्यांनी अनेक विकास कामे पूर्ण करुन घेतली आहेत. कुणी नागरिक अडचणीत असेल तर रात्री बेरात्री देखील ते मदतीसाठी धावून जातात हे त्यांचे वैशिष्टय होय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच महायुतीच्या रत्नागिरी प्रभाग ३ मधील उमेदवार प्रिती रविंद्र सुर्वे या देखील न.प.मधील एक ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी रत्नागिरी न.प.मध्ये सभापतीपद कार्यक्षमपणे भुषविले आहे. रत्नागिरीतील सुप्रसिध्द उद्योजक रविंद्र सुर्वे यांच्या त्या सौभाग्यवती होत. त्यांनी प्रभाग ३ मध्ये अनेक विकास कामे केली आहेत. कुणा नागरिकाचे काही काम निघाले तर त्या न.प.मध्ये धाव घेतात व काम करुन देतात. त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे. रत्नागिरी प्रभाग ३ मधील महायुतीचे उमेदवार राजन शेट्ये व प्रिती सुर्वे यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजपा महायुतीचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. हे दोघेही उमेदवार प्रशासन कुशल व अनुभवी नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांना सर्व मतदार बंधु भगिनींनी आपली मते देऊन मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg