कणकवली (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपा विरुद्ध सर्व पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजपाची एकाकी झुंज सुरू असून कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण येथे विरोधक भाजपाला घेरण्यासाठी एकवटले आहेत. मात्र या सार्या परिस्थितीत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे हे ‘वन मॅन आर्मी’ प्रमाणे विरोधकांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे त्यांनी चारही नगरपरिषद भागात दाखवून दिले आहे. नाम. नितेश राणे यांच्या व्यतिरिक्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वगळता भाजपाचा वरिष्ठ एकही नेता सिंधुदुर्गात फिरकला नसल्याने ना.नितेश राणे यांच्या नेतृत्वावर भाजपाने विश्वास व्यक्त केल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप शतप्रतिशत करण्याचा निर्धार केला असून त्याची सुरुवात नगरपंचायत निवडणुकीपासून झाली असावी, असे मानले जात आहे. यामुळेच राज्यात भाजपा शिंदे शिवसेना महायुती असताना सिंधुदुर्गात मात्र महायुतीत खडा पडला आहे. त्यामुळेच जोरदार राजकीय रणकंदन माजले आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नाम. नितेश राणे यांनी भाजपाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली असून त्यांच्या विरोधात कुडाळ मालवणचे आम. निलेश राणे, सावंतवाडीचे आम. दीपक केसरकर , माजी आम. वैभव नाईक, माजी आम. राजन तेली, माजी आम. परशुराम उपरकर यांच्यासह शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत ही सारी मंडळी एकवटली आहेत. त्याबरोबरच राज्याचे उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात येत कणकवली शहर विकास आघाडी त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना राजकीय बळ दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे तीन नगरपरिषद क्षेत्रात सभा घेत पक्षाला बळकटी देत आहेत. त्यामुळे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे भाजपाच्या प्रचारासाठी चारही नगरपरिषद भागात एक हाती किल्ला लढवीत आहेत. नामदार नितेश राणे यांनी कणकवली बरोबरच सावंतवाडी वेंगुर्ले आणि मालवण येथील निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली असून त्या अनुषंगाने बैठकांना जोरदार सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची साथ त्यांना मिळत असून सिंधुदुर्गातील भाजपा ही नामदार नितेश राणे यांच्या पाठीशी या निमित्ताने एकवटली आहे.
नाम. नितेश राणे यांचे बंधू कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पक्ष संघटनेच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांच्या इंट्रीने कणकवली नगरपंचायत निवडणूक मात्र गाजली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी सर्व प्रभागांमध्ये स्वतः दाखल होत निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि संपूर्ण भाग पिंजून काढला. भाजपा पदाधिकार्यांना सोबत घेत निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. दि.२ डिसेंबर रोजी निवडणुका होत आहेत. दि. ३ डिसेंबर रोजी निकाल लागेल आणि या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाल्यास त्याचे जास्तीचे श्रेय आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त भाजपचा कोणीही नेता सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी न आल्याने सद्यस्थितीत तरी वन मॅन आर्मी प्रमाणे नाम. नितेश राणे यांनी विरोधकांना जेरीस आणल्याचे चित्र आहे.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.