loader
Breaking News
Breaking News
Foto

ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी यांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गावखडी (वार्ताहर) - राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री दत्त मंदिरामध्ये प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा ओम गुरुदत्त शिष्य मंडळ मुंबई कशेळी व स्थानिक भक्तगण यांच्या वतीने दि.४-१२-२०२५ रोजी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये पुढील प्रमाणे कार्यक्रम होतील. दि.४/१२/२०२५ पहाटे ५ वा. काकड आरती सप्त देवतांची पूजा, होम हवन , गुरुचरित्र पारायण, दु. १२ वा. महाप्रसाद, सायं. ४वा. आनंदाबुवा होळकर यांचे श्रीदत्त जन्मावर किर्तन, सांय 6वा. श्री दत्त जन्मोत्सव नंतर ओम ध्वनी आरती पालखी प्रदक्षिणा होईल. दि. ५/१२/२०२४दु. १२ वा. माधुकरी प्रसाद, सायं.५ वा. सत्यनारायणाचे महापूजा, आरती, दर्शन, रात्री ८ वाजता - महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व भाविक व भक्तगणांना विनंती करण्यात येते की, श्री दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवाचा व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपणा सर्वांचे सहकार्य, सहयोग व सहभाग प्रार्थनीय आहे. तसेच भाविक भक्तगणांना विनंती करण्यात येते की दत्त जयंतीला महाप्रसादासाठी कोणाला देणगी द्यावी याची असेल तर रोख रक्कम स्वरूपात देण्यात यावी आपली देणगी महाप्रसादाला वापरली जाईल याची भक्तगणांनी नोंद घ्यावी. वरील कार्यक्रमांमध्ये वेळेनुसार बदल करण्याचे अधिकार ओम गुरुदत्त शिष्य मंडळाकडे असतील याची सर्व भाविक भक्तगणांनी नोंद घ्यावी.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg