खेड (प्रतिनिधी)- संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्यावतीने संविधान जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष व खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे चिटणीस सुरेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या रॅली मध्ये विविध गावातील बंधु भगिनी, विविध कर्मचारी वर्ग व तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सहभाग घेतला होता. या रॅलीची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून होऊन खेड बाजारपेठ, तीन बत्ती नाका, नगरपरिषदेतील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजामाता उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय मार्गे एस. टी. स्टॅन्ड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सांगता करण्यात आली.
तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक पी.आर. तांबे यांनी भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन करून संविधानाचे महत्व विषद केले. भारताचे संविधान सर्वानी समजून घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गाने चालले पाहिजे. राष्ट्र हा कोणत्याही धर्माचा नसावा. म्हणून आपला देश धर्म निरपेक्ष आहे. देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आपण कायद्या समोर सर्व समान आहोत. संविधानाची मूल्ये जपण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहीले पाहिजे असे मत मांडले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस सचिन गोवळकर, संदिप गोवळकर, पंचायत समिती माजी सदस्य गणेश मोरे, महेश मोहिते, महिला अध्यक्षा स्वाती जाधव, युवा मंचचे अध्यक्ष अनिल पवार, संदिप सावंत, रिना तांबे, अपूर्वा पवार, मोतीराम जाधव, महेश मर्चंडे, चंद्रमणी रूके आदी मान्यवर तसेच पुरोगामी चळवळीचे पदाधिकारी, विविध शाखा व गटातील कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कांबळे, सूत्रसंचालन दिपक कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे कार्यकर्ते भागुराम तांबे, निलेश तांबे, प्रमोद येलवे, दिनेश महाडिक व सर्व सभासदांचे मोलाचे योगदान लाभले.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.