loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविकास आघाडीच्या सौ.हुस्नबानू खलिफे (राजापूर), सौ. पूर्वा मुळे (लांजा,कुवे) व सौ. सबुरी थरवळ (देवरुख) या रणरागिणींना विजयी करा : रविंद्र माने, सौ. नेहा माने

महाविकास आघाडीच्या वतीने राजापूर, लांजा व देवरुख या तीनही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी कर्तबगार, सुसंस्कृत व जनहित दक्ष अशा ३ रणरागिणी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राजापूरच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ. हुस्नबानू खलिफे, लांजा, कुवेच्या नगराध्यक्षपदासाठी सौ. पूर्वा मुळे व देवरुखच्या नगराध्यक्षपदासाठी सौ. सबुरी थरवळ या ३ कर्तबगार रणरागिणी कणखरपणे निवडणूक लढवित आहेत. तसेच या तीनही न.प.मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व प्रभागांमध्ये निवडणुकीमध्ये उभे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणचे ज्येष्ठ नेते श्री. रविंद्र माने व धडाडीच्या नेत्या सौ. नेहा रविंद्र माने यांनी सांगितले की, ‘‘राजापूर, लांजा व देवरुख या तीनही ठिकाणी महाविकास आघाडी अभेद्य आहे. येथे महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी अतिशय संयमी व समंजस असल्याने एकजुट अभंग राहील. या तीनही ठिकाणी सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे या तीनही न.प.मध्ये महाविकास आघाडीच्या कर्तबगार रणरागिणी निवडणूक लढवीत आहेत. राजापूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. हुस्नबानू खलिफे या यापूर्वीही राजापूरच्या नगराध्यक्षा होत्या. तसेच त्या सहा वर्षे विधान परिषदेत आमदार होत्या. त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यकाळात राजापूर नगरीसाठी खूप विकास कामे झाली. लांजा, कुवे येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पूर्वा मुळे व देवरुख येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सबुरी थरवळ या देखील मागील दोन निवडणुकीत नगरसेवक पदासाठी निवडून आलेले आहेत. सौ. पूर्वा मुळे यांनी उपनगराध्यक्षपद सांभाळले होते. तर सबुरी थरवळ यांनी सभापतीपद कार्यक्षमतेने सांभाळले होते.

टाइम्स स्पेशल

या तीनही रणरागिणी जणू चंडिकेचा अवतार धारण करुन निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. या तीनही रणरागिणी सृजनशील, कर्तव्यतत्पर व जनहित दक्ष अशा आहेत. त्या प्रशासन कुशल व अनुभव संपन्न आहेत.. विकास निधी कसा मिळवायचा हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचे विकास कार्यात मोठे योगदान आहे. म्हणूनच सुज्ञ व चोखंदळ मतदार बंधू भगिनींनी या तीनही रणरागिणींना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे’’ असे श्री. रविंद्र माने व सौ. नेहा माने यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg