वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील बौद्धवाडी येथील बौध्द विकास मंडळ यांच्या विद्यमाने वरवेली परिवेण बुध्दविहार येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व पवित्र अस्थिकलशास विनम्र अभिवादन शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. या निमित्ताने शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्रौ १० वा.गावातून शांतता अभिवादन रॅली, रात्रौ ११ वा.मान्यवरांच्या हस्ते अस्थिकलश व प्रतिमांना पुष्पहार अपर्ण व दिप प्रज्वलन, रात्रौ ११.३० वा.सामुदायिक बुध्द वंदना व धार्मिक पुजापाठ, बौध्दाचार्य-आयु. शशिकांत जाधव माजी श्रामणेर मयुर म.पवार, रात्रौ १२ वा. पवित्र अस्थिकलश अभिवादनास सर्वांना खुला, शनिवार दि. ६ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. स्थळ माता रमाई भिमराव आंबेडकर सभागृह येथे अभिवादन सभा, प्रमुख वक्ते...ओबीसी नेते राजाराम पाटील विषय_ शिवछत्रपर्तीची रणनिती आणि डॉ.बाबासाहेबांची सामाजिक निती शिवशाही ते संविधानशाही
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून जि. प. रत्नागिरी कृषी विभागाचे सहाय्यक प्रशासक अधिकारी संतोष गमरे, बौ.सह संघ मुंबई, ता. गुहागरचे माजी प्रमुख विश्वस्त संजय पवार, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध विकास मंडळ, मुंबई शाखा अध्यक्ष आयु. राजेश वसंत पवार, तर कार्याध्यक्षपदी बौद्ध विकास मंडळ गाव शाखा अध्यक्ष आयु.वैभव पवार असणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राहुल पवार व आयु ब अमोल पवार करणार आहेत.
देशातील कोट्यावधी जनतेचे उद्धारक, थोर समाज क्रांतिकारक, प्रख्यात कायदेपंडित, भारताच्या लोकशाही राज्यघटनेचे महान शिल्पकार व बौध्दधम्म प्रवर्तक, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषास व त्यांच्या पवित्र अस्थिकलशास अभिवादन करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन बौद्ध विकास मंडळ वरवेली गाव शाखा व मुंबई शाखा, महिला मंडळ, तरूण मंडळ, कन्या मंडळ यांनी केले आहे.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.