loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरोली मोरेवाडी येथे ३ ते ५ डिसेंबर श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील साखरोली-मोरेवाडी येथील श्री दत्तकृपा सेवा मंडळाच्या वतीने बुधवार दि. ३ ते शुक्रवार दि.५ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्रीदत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ३:४५ वाजता अखंड हरिनाम सप्ताह (२४ तास) प्रारंभ, गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सायं. ३:४५ - अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती, सायं. ४- श्रीदत्त जन्मकाळ सोहळा, सायं.५ - पालखी मिरवणूक, सायं.७ - आरती, रात्री ८-महाप्रसाद रात्री १० - श्री दत्तकृपा सेवा मंडळ आयोजित श्री दत्तकृपा कलापथक साखरोली मोरेवाडी यांचे बहुरंगी नमन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी पहाटे ५- श्री दत्तकृपा सेवा मंडळ साखरोली मोरेवाडी यांच्यावतीने काकड आरती, सकाळी ७:३० - काल्याचे कार्यक्रम, सकाळी ९- सत्यनारायण महापूजा, दुपारी १:३० -महाप्रसाद, सायं. ७ - श्री दत्तकृपा सेवा मंडळ साखरोली मोरेवाडी यांचा हरिपाठ, रात्रौ ८:३० - महाप्रसाद आणि रात्रौ १० - श्री दत्तकृपा सेवा मंडळ साखरोली मोरेवाडी यांच्या भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी या दत्तजयंती उत्सव सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साखरोली- मोरेवाडी येथील श्री दत्तकृपा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg