खेड - श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ( सी.बी.एस.ई.) वेरळ येथे शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. नूतन इंग्लिश स्कूल, तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यनारायण मिश्रा यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता सरस्वती देवीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे उद्याच्या युगातील वैज्ञानिक निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक गोष्टींची जाणीव करून देणे हा असतो. या विज्ञान प्रदर्शन प्रदर्शनामध्ये प्रशालेतील प्ले ग्रुप ते अकरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. यामध्ये टाकाऊतून टिकाऊ ,वेळेची बचत ,नैसर्गिक व आधुनिक शेती, प्रगत तंत्रज्ञान, वाहतुकीची साधने व दळणवळण इत्यादी विषयांवर आपले कौशल्य व आवड दाखवत आपल्या प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखविला. ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरजचे विज्ञान शिक्षक प्रतिक पवार व मनोज सुतार यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रमुख पाहुण्यांनी व परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्था उपाध्यक्षा सौ.सुप्रिया पाष्टे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कु.निदा महाडिक यांनी केले.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.