loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तालुक्यातील धामणपे येथे उद्यापासून तीन दिवस दत्तजयंती उत्सव

केळंबे-लांजा (सिराजनेवरेकर) - राजापूर तालुक्यातील धामणपे गावी श्री दत्तगुरु सेवा मंडळातर्फे दत्तजयंती निमित्त ०३ ते ०५ डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि ३ डिसेंबर रोजी मर्यादित षटका़चे ओव्हर आर्म क्रिकेट सामने ठेवण्यात आले आहेत. दि.४ डिसेंबरला होम हवन, मुर्ती अभिषेक, भव्य पालखी शोभायात्रा, महाप्रसाद व रात्री ठिक १० वा झर्ये येथील बाळकृष्ण पांचाळ बुवा यांच्या श्री अदिष्टी सत्यनारायण भजन मंडळाचा सश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि ०५ डिसेबर रोजी महिलांसाठी हळदिकुंकु, नवसाची गार्‍हाणी व रात्री फुलोरा प्रस्तुत प्रसाद पंगेरकर लिखित व दिग्दर्शित पुर्वज हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे. धामणपे गावच्या या दत्त जयंती उत्सवाचं हे ३६ वर्ष आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg