कुडाळ - सिंधुदुर्ग : राज्यभर निवडणूक निकालांचे जल्लोषाने वातावरण रंगले होते. कुठे विजयाचे फटाके, कुठे पराभवाची शांतता पाहायला मिळाली. पण सिंधुदुर्गातील पिंगुळी येथील शेटकरवाडीमध्ये उधळलेला गुलाल मात्र सत्तेसाठी नव्हता, तर देशसेवेच्या स्वप्नपूर्तीचा होता. हा गुलाल होता कष्ट, संघर्ष आणि मातृत्वाच्या विजयाचा आहे.आई आईच असते, तिची माया, तिच्यासारखे प्रेम जगात कुठेच नसते. जेव्हा आईने मुलाला पाहिले तेव्हा सुरवातीला दचकून उभी राहीली. भाजी विकता विकता ती गहिवरून गेली. मुलाने आल्याआल्या बाजारातच आईच्या पायावर आपले मस्तक ठेवले. आईला काहीच कळेना, तेव्हा त्या मुलाने आईला सांगितले की, आई गं मी आता सैन्यात जवान म्हणून कामाला जातोय. देश सेवेसाठी निघालोय, आईचे डोळे पाणावले. कुडाळच्या पिंगुळे मधील शेटकरवाडीत राहणारी माऊली भाजी विकून संसार चालवते. आज त्याचे दुःख सरुन गेले आहे. निवडणुका होत राहतील पण अशी मुले जेव्हा ध्येय साध्य करण्यासाठी अती मेहनत घेऊन यश मिळवतात, तो खरा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यायला हवा. निवडणूका येत जात राहतात पण हा आदर्श देखील समोर ठेवून आजच्या पिढीने आपले दारिद्र नष्ट केले पाहिजे.
आनंद गोपाळ सावंत याने आपली सीआरपीएफ (CRPF) विभागात निवड झाल्याचा आनंद कुडाळच्या फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आपल्या आईसोबत साजरा केला. या दृश्याने क्षणभर उपस्थित लोकांचे सुद्धा डोळे भरून आले. कारण हा केवळ एका तरुणाचा यशस्वी प्रवास नव्हता, तर गरिबीशी झुंज देत, घाम गाळत, स्वप्नांना पंख देणाऱ्या आईच्या त्यागाचा गौरव होता. आईच्या हातातील भाजीची टोपली आणि मुलाच्या डोळ्यांत चमकणारे देशसेवेचे स्वप्न. या दोहोंमधील नातं समाजाला खूप काही सांगून जातं.
आजच्या काळात यशाची मोजणी केवळ पद, पैसा आणि प्रसिद्धीवर केली जाते. मात्र गोपाळच्या यशाने दाखवून दिलं की खरी श्रीमंती ही कष्ट, संस्कार आणि देशप्रेमात असते. फुटपाथवरून थेट देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास लाखो तरुणांना प्रेरणा देणारा आहे. या यशाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेले अभिनंदन सुद्धा महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजाने अशा यशकथांकडे पाहण्याचा दृष्टीकोन. निवडणूक निकाल काही दिवस चर्चेत राहतात, मात्र गोपाळसारख्या तरुणांच्या कथा पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देत राहतात.













































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)

























































































































































































































.jpg)















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.