loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर मध्ये बळीराज सेना प्रथमच स्वबळावर

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून असगोली जिल्हा परिषद गटातून बळीराज सेनेचे विद्यमान तालुका अध्यक्ष अरुण भुवड यांनी आपला उमेदवार अर्ज आज भरला. यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम माळी, विधानसभा महिला आघाडी प्रमुख कातकर, तालुका सचिव ॲड.दिनेश कदम, तालुका उपाध्यक्ष संतोष पास्टे, तालुका महिला आघाडी प्रमुख श्रावणी शिंदे, स्वप्नाली डावल, युवक अध्यक्ष विवेक जागली, प्रचार प्रमुख अशोक रावणंग, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी सचिन भुवड, शाखप्रमुख नामदेव अवेरे आदी. कार्यकर्ते उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बळीराज सेनेच्यावतीने राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सोबत मैत्रीपूर्वक युती झाल्याचे बोलले जात असून बळीराज सेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा घड्याळ चिन्हावर निवडणुकीत भाग घेत आहेत. असगोली जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव व महायुतीचे संतोष जैतापकर यांचे समोर आहेत. बळीराज सेनेचे अरुण भुवड हे या जिल्हा परिषद गटातील स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळे यावेळी चुरस अटी-तटीची होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg