चिपळूण (इकलाक खान): जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षाकडून तुल्यबळ असे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला असतानाच खेर्डी पंचायत गणात अतिशय चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. शिवसेना उबाठा चे युवासेना तालुकाप्रमुख उमेश खाताते, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भुरण असे तीन पक्षाचे तालुकाध्यक्ष समोरासमोर उभे ठाकले असल्याने खेर्डी गण आता लक्षवेधी ठरला आहे.
चिपळूण शहराला लागून असलेले खेर्डी गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. येथील कोणतीही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते. तसेच प्रत्येक निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. कधी एकत्र तर कधी थेट एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्याची राजकीय परंपरा येथे आहे. त्यामुळे येथील निवडणुकीचे निकाल नेहमीच आश्चर्यकारक व अनपेक्षित लागतात.साहजिकच खेर्डीतील कोणतीही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. यावेळी देखील ही परंपरा कायम राहिली असून एकमेकांचे जवळचे मित्र असलेले तीन बलाढ्य नेते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकले आहेत.
खेर्डी जिल्हापरिषद गटात खेर्डी पंचायत समिती गण हा पूर्ण खेर्डी ग्रामपंचायत हद्दीचा एक पंचायत समिती गण आहे.२०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत येथे अनिल शेठ दाभोळकर, नितीन ठसाळे व प्रशांत यादव अशी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. आता देखील तीच परिस्थिती येथे दिसून येत आहे.कारण यावेळी चक्क तीन राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडणूक रिग्नात उतरले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे युवासेना तालुकाप्रमुख उमेश खाताते आणि भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांनी या गणातून आपले उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. नितीन ठसाळे यांच्यापाठी आमदार शेखर निकम यांनी ताकद लावली आहे. तर उमेश खाताते यांच्यासाठी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव मैदानात उतरले आहेत. विनोद भुरण यांच्याकडे भाजप नेते प्रशांत यादव यांची ताकद आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या तिन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा खेर्डी पंचायत समिती च्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. तसेच खेर्डी ग्रामपंचायतीची आगामी निवडणूक पाहता या निवडणुकीला देखील मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.