loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली गटस्थापना

ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठामपा गटनेतेपदी निवड केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. ठाणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, माजी विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. अश्रफ शानू पठाण हे ठाणे महानगर पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदही भूषविले आहे. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक 32 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपले पॅनल त्यांनी मोठ्या फरकाने जिंकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg