लांजा,दि.२४ जानेवारी :- पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लांजा तालुक्यात शिवसेना (शिंदे)व भाजपा युतीच्या उमेदवारांमध्ये माजी आमदार राजन साळवी यांच्या समर्थकांना झुकते माप मिळाल्यामुळे साळवीसमर्थक आनंद व्यक्त करत आहेत. लांजा पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला एक जागा देण्यात आली आहे.वास्तविक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या दोन जागा तर जिल्हा परिषदेची एक जागा मागितली होती.पण प्रत्यक्षात पंचायत समितीचा भांबेड हा एकच गण भाजपाला देण्यात आला असून तिथे तालुकाध्यक्ष शैलेश मनोहर खामकर यांना भाजपाची उमेदवारी मिळाली आहे.
यावेळच्या निवडणुकीत माजी आमदार राजन साळवी यांच्या किती समर्थकांना तिकीट मिळणार याची उत्सुकता होती. माजी आमदार राजन साळवी यांचे शिवसेना (शिंदे)पक्षात चांगलेच वजन वाढल्याचे बोलले जात आहे.लांजा तालुक्यात माजी आमदार साळवी यांच्या कट्टर समर्थक लिला घडशी यांना साटवली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाली आहे.त्यांचे गाव दुसऱ्या मतदार संघात आहे. वाकेड गणातून रसिका रमाकांत मेस्त्री यांना उमेदवारी मिळाली आहे.गवाणे गणातून दिपाली संदीप दळवी यांना उमेदवारी मिळाली आहे. दिपाली दळवी यांचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अगदी शेवटच्या घटकेला त्यांना गवाणे गणात आणण्यात आले. दुसऱ्या मतदार संघातून त्यांना तिकीट मिळाल्याने पक्षाला स्थानिक उमेदवार मिळाला नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे. साळवी यांचे आणखी एक समर्थक जयसिंग उर्फ जया माने यांना साखरपा कोंडगाव गणातून उमेदवारी मिळाली आहे.
साळवी समर्थक लिला घडशी, दिपाली दळवी, रसिका मेस्त्री , जया माने या चारही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांच्या प्रचारासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. गावागावातील घरोघरी जाऊन साळवी यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच त्यांना पक्षाचे तिकीट मिळवून देण्यास माजी आमदारांनी आपले राजकीय वजन खर्च केल्याचे त्यांच्या समर्थकांमध्ये बोलले जात आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.