loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या कौस्तुभ बुटाला यांचे झ्युरिक स्वित्झर्लंड येथे एआयवर व्याख्यान

खेड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झ्युरिकमधील दौऱ्या मध्ये खेडच्या सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त कौस्तुभ बुटाला यांचे एआयवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी दावोसला केडब्लूआर समूहाशी महाराष्ट्रातील विमानतळ व इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर चर्चा झाली. स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम (GIF) 2026’ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विविध सत्रे व उद्योगसंवाद झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच दिवशी “Industry Insights: The Road Ahead” या सत्रात AI Strategist कौस्तुभ बुटाला यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष (real-world) अंमलबजावणीसाठी रोडमॅप या विषयावर व्याख्यान दिले. उत्पादन, सेवा, ऑपरेशन्स, गुणवत्ता आणि निर्णयप्रक्रियेत एआय कसा उतरवायचा, कोणत्या प्रक्रियांमध्ये बदल करायचा आणि परिणाम कसे मोजायचे यावर त्यांनी व्यावहारिक मांडणी केली. दरम्यान, दावोस येथे (WEF 2026 च्या पार्श्वभूमीवर) कौस्तुभ बुटाला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वित्झर्लंडस्थित केडब्लूआर समूहाशी भेट घडवून आणली. या भेटीत केडब्लूआर समूहाचे डेनीज अक्गूल आणि मंगेश वैद्य उपस्थित होते. श्री. बुटाला यांच्या माहितीनुसार, केडब्लूआर समूहाने महाराष्ट्रातील विविध विमानतळ विकास तसेच इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सुमारे १ अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच सवलतीच्या व्याजदरात संरचित वित्तपुरवठा करून महाराष्ट्रातील रखडलेल्या/अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्यास मदत करण्याबाबतही चर्चा झाली. या चर्चा संकल्पनात्मक (conceptual) पातळीवर झाल्या असून पुढील टप्प्यात संबंधित विभाग/यंत्रणांशी तांत्रिक व वित्तीय तपशीलांवर बैठकांचे नियोजन केले जाणार असल्याचे बुटाला यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg