loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली पंचायत समितीसाठी शिवा गावडे यांच्या प्रचारला सुरुवात

इन्सुली : येथील पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवा गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज भरताना संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अर्ज दाखल करताना व्यासपीठावर आणि रॅलीमध्ये संघटनेचे खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ज्ञानेश्वर पारधी (वरिष्ठ पदाधिकारी) सोन्सुरकर (महिला उपाध्यक्ष), धिरज गावडे (तालुकाध्यक्ष,कल्याण कदम (सह सचिव), रामचंद्र कुडाळकर (उपाध्यक्ष), संचिता गावडे (महिला शहराध्यक्ष), यावेळी उमेदवाराचे बंधू राजू गावडे आणि दिनेश गावडे यांच्यासह सागर परब, पूजा गावडे, सेजल पेडणेकर, संगीता पारधी आणि श्याम सावंत यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

टाईम्स स्पेशल

यावेळी अभय गावडे, शरद सावंत, प्रणिता सावंत, कल्पना सावंत, दर्शना राणी, एकनाथ शेट्ये, संदीप नाईक, मंदार खानोलकर, किशोर रावराणे, भाऊसाहेब देसाई, लक्ष्मण भुते, महेश्वर कुंभार, कृष्णा पास्ते, सुरेश गावडे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवा गावडे यांच्या उमेदवारीमुळे इन्सुली पंचायत समितीच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली असून, संघटनेने प्रचारात आघाडी घेण्याचे संकेत दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg