loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील सीएनजी सेवा तातडीने सुरू करा; रिक्षा युनियनचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील पावसकर पेट्रोल पंपावरील सीएनजी गॅस सेवा गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असल्याने रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी सावंतवाडी रिक्षा युनियनच्या वतीने प्रांताधिकारी समीर घारे यांना निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील पावसकर पेट्रोल पंपावर गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू आहे. सध्या हे काम पूर्ण झाले असून सीएनजीची डायरेक्ट पाईपलाईन कार्यान्वित झाली आहे. मात्र, तरीही अद्याप पंपावर गॅस भरणी सुरू करण्यात आलेली नाही. याबाबत पंपचालकांना विचारणा केली असता, 'नागपूरवरून सर्टिफिकेट यायचे आहे, ते आल्यावरच पुरवठा सुरू होईल' असे उत्तर गेल्या आठ दिवसांपासून दिले जात असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

शहरात सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाचालकांना झाराप झिरो पॉईंट येथील पंपावर १० किलोमीटर अंतरावर गॅस भरण्यासाठी जावे लागते. रिकाम्या गाड्या घेऊन जाणे आणि येणे रिक्षाचालक व मालकांना परवडणारे नाही. या मानसिक आणि आर्थिक त्रासातून सुटका करण्यासाठी प्रशासनाने पंपचालकांकडे शहानिशा करावी आणि लवकरात लवकर सीएनजी सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ​यावेळी रिक्षा युनियनचे सल्लागार सुधीर पराडकर, अध्यक्ष धर्मेंद्र सावंत,उपाध्यक्ष महादेव गंगाराम बामणे, जनरल सेक्रेटरी सदानंद लक्ष्मण धर्णे, मुख्य खजिनदार जयवंत रामचंद्र टंगसाळी आणि ॲड. चेतन महादेव बामणे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg