loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ८ रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

मालवण : (प्रतिनिधी) - मालवण शहरातील एसटी स्टॅन्ड नाजिकच्या श्री राम मंदिरात गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा दि. ८ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण, सकाळी ८ वा. गजानन महाराजांची महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती व नैवेद्य, दुपारी १ ते ३ पर्यंत झुणका-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायं. ५ वा. भक्ती संगीत कार्यक्रम 'स्वरसंध्या' होणार असून प्रसिद्ध गायक ऍड. दिलीप ठाकुर (संगीत अलंकार) हे सादर करणार आहेत. सायंकाळी ७ वा. गजानन महाराजांचा प्रकटदिन देखावा सादर केला जाणार आहे. सायंकाळी ७.३० वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा 'कृष्ण-सुदाम भेट' हा नाट्यप्रयोग रंगणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन गजानन महाराज (शेगाव) भक्त मंडळ, मालवणने केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg