loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरातून हापूस आंब्यांची पहिली पेटी पुण्याच्या मार्केटमध्ये; विक्रमी दर

पुणे : कोकणातील हापूस आंब्यांची पहिली प्री-हार्व्हेस्ट आवक पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये शुक्रवारी झाली. या प्री-हार्व्हेस्ट आवकने संपूर्ण बाजाराचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाढती मागणी आणि मर्यादित आवक यामुळे प्रत्येक पेटीला तब्बल १५,००० रुपये एवढा प्रीमियम दर मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जैतापूर (रत्नागिरी जिल्हा) येथून मागवलेल्या या मालात चार पेट्यांचा समावेश होता. प्रत्येक पेटीत तीन डझन हापूस आंबे होते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, फळभाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे आणि युवराज काची यांनी या पहिल्या आवकचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर संपूर्ण मालाची खरेदीही त्यांनीच केली. सामान्यतः मार्चपासून बाजारात रत्नागिरी हापूस आंब्यांची आवक सुरु होते. परंतु, हा माल हंगामपूर्व (प्रीसीजन) मध्ये काढलेला असल्याने तो बाजारात लवकर उपलब्ध झाला आहे, अशी व्यापार्‍यांची माहिती आहे. हापूससोबतच एक पेटी केसर आंब्यांची आवकही मार्केट यार्डमध्ये झाली. यावर्षी अधूनमधून काही हापूस आंब्यांच्या लवकर आवक झाल्या असल्या तरी एकूण प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे दर अजूनही कडाडलेले आहेत. मुख्य हंगामात आवक वाढू लागल्यानंतर दर स्थिर होतील आणि काहीसे कमी होतील, असं व्यापार्‍यांचं म्हणणं आहे.

टाईम्स स्पेशल

आंबा व्यापार्‍यांच्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यातील अनुकूल हवामान विशेषतः दीर्घकाळ टिकलेली थंडी, यामुळे आंब्याच्या बागांमध्ये फुलोरा चांगला आला आहे. फुलोरा अधिक काळ टिकून राहिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे. हापूस आंब्यांची नियमित आवक १५ ते २० फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg