loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीगणेश मूर्तीकार संघ राजापूरच्या माघी गणेश जयंती उत्सवात भरगच्च कार्यक्रम

राजापूर (वार्ताहर) - श्रीगणेश मूर्तीकार संघ राजापूरच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला असून हा उत्सव २६ जानेवारीपर्यंत वरचीपेठ येथील श्रीमहापुरूष सेवा मंडळ येथे साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवात श्र्रीगणेशाच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उत्सवाचे हे नववे वर्ष आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरूवार दि.२२ जानेवारी सकाळी साडेनऊ वाजता ढोल ताशांच्या गजरात श्रींचे आगमन झाले. यावेळी श्रींची प्राणप्रतिष्ठा सोलगांव येथील मूर्तीकार काशिनाथ गुरव यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी महाप्रसाद, रात्री संगीत भजन आदि कार्यक्रम संपन्न झाले. शुक्रवार दि.२३ जानेवारी देवगड येथील समई नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. शनिवार दि.२४ रोजी लांजा येथील कोकाकोलाज उत्सव मंडळाच्या वतीने भोवरा व आरती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान रविवार दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता हळदीकुंकू, श्रीसत्यनारायण महापूजा, सोमवार दि.२६ जानेवारी रोजी महाआरती, महाप्रसाद, श्रींची विसर्जन मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी मूर्तीकारांना संघटनेकडून पाच पेनगनची भेट देण्यात येणार आहे. ही वस्तू मूर्तीकारांच्या उपयोगातील आहे.

टाईम्स स्पेशल

दरवर्षी असा उपक्रम राबवण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. यामध्ये कॉम्प्रेसर, साचे, रंग आणि उपयोगी वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवासाठी उत्सवप्रमुख महादेव खांबल, उपाध्यक्ष साईनाथ पड्यार, सचिव दीलिप जोशी, सदस्य अनंत आडविलकर, तुषार पांचाळ, अभिजित सूतार, निलेश उर्फ बाळू रहाटे, अजय तांबडे, जीवन सूतार, दीपक खांबल, प्रदीप पालकर, मिलिंद कडू आदी सहकार्‍यांसह परिश्र्रम घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg