खेड - खेड तालुक्यातील वरवली येथे जगबुडी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष दगडू आखाडे (रा. वरवली-सुतारवाडी) असे या मृत तरुणाचे नाव असून, २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण आखाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा नेहमीप्रमाणे गावातील जगबुडी नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने त्याचे वडील दगडू गंगाराम आखाडे हे काळजीपोटी त्याला पाहण्यासाठी नदीकाठी गेले. यावेळी त्यांना नदीच्या कडेला असलेल्या एका दगडावर संतोषचे कपडे आणि चपला दिसून आल्या, मात्र मुलगा कुठेच दिसत नव्हता. संशयावरून त्यांनी आजूबाजूला आणि पाण्यात शोध घेतला असता, संतोषचा देह नदीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला.
वडिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने नदीकाठी धाव घेतली आणि संतोषला पाण्याबाहेर काढले. त्याला वाचवण्यासाठी तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भर तारुण्यात मुलाचा अंत झाल्याने वरवली सुतारवाडीमध्ये शोककळा पसरली आहे.





















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.