loader
Breaking News
Breaking News
Foto

रियाज चौघुले ठरला "रत्नागिरी श्री" चा मानकरी

खेड : खेड पंधरागाव विभागातील वावे गावचा सुपुत्र बॉडी बिल्डर रियाज चौगुले याने शरीर सौष्ठव निवड चाचणी स्पर्धेत आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा "रत्नागिरी श्री" हा गोल्ड मेडल पटकाविला आहे. त्यामुळे त्याला आता राज्यस्तरावर आपला खेळ दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आदर्श क्रिडा व सामाजिक प्रभोधिनी च्या माध्यमातून व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा कावीळतली चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच, राष्ट्रीय प्रशिक्षक तसेच अंतराष्ट्रीय प्रशिक्षक देखील उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रियाज ने "रत्नागिरी श्री" हा मानाचा गोल्ड मेडल पटकाविण्यात यश मिळविले आहे. रियाजने आपला हा विजय नुकत्याच निधन झालेल्या आपल्या वडिलांना समर्पित केला आहे. आपल्या या यशामध्ये आई- वडील, कुटुंबिय व आंतरराष्ट्रीय कोच नंदू शिदे यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने म्हटले आहे. रियाज चौघुले हा इकबाल चौघुले यांचा पुतण्या असून "रत्नागिरी श्री" हा शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा गोल्ड मेडल त्याने पटकाविल्याबद्दल त्याच्यावर विविध स्तरातू अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg