loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय. हजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्यु. काॅलेज खेडमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अल् मदिना वेलफेअर असोशिएशन व्दारा संचलित एम.आय.हजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज खेड शाळेमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मन्सूर मुकादम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीताचे गायन केले. इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली. मुहमद खोत याने (इंग्रजी), अलिना चोगले (हिंदी), अब्दुल गनी परकार (उर्दू) व अम्मारा अंतुले (मराठी) या विद्यार्थ्यांनी या सर्व भाषेमधून भाषण सादर केले. आपल्या भाषणातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे योगदान, पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचे योगदान या विषयांवर प्रकाश टाकला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी निबंधलेखन स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा, गणित प्रश्नमंजूषा स्पर्धा, ऑलंपियाड परीक्षा, फन फेअर स्पर्धा इत्यादी स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचा प्रशस्तीपत्र  व चषक देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सफा चोगले व अशिया महाडीक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष निसार खतीब, स्कूल कमिटी चेअरमन सिकंदर जसनाईक, संस्था सचिव मन्सूर मुकादम, सह सचिव शौकत मुजावर, खजिनदार गुलाम मोहिद्दीन तांबे, सह खजिनदार सिराज पटेल, संचालक हनिफ घनसार आरीफ मुल्लाजी, निसार सुर्वे, दुर्वेश पालेकर, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg