loader
Breaking News
Breaking News
Foto

चित्रकला स्पर्धेत एल. टी. टी. चे सुयश

खेड - येथील खेड लायन्स एज्यू सोसायटी संचालित एल टी टी इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यू. कॉलेज ने 26 जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. कोकणी मुस्लिम संघ खेड यांच्यावतीने आयोजित तारे जमीन पर या स्पर्धेत प्रशाळेतील आलिया जावेद परकार इ 9वी, मंजिरी चैतन्य भाट इ 7वी, मोहम्मद आमीन गझाली इ. 4वी, आणि मारवा कडवेकर इ 3वी या विद्यार्थ्यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकावून सायकल विजेते ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम तसेच परवेज मुकादम, माजिद खतीब, जयेश गुहागरकर, प्रेमळ चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक जॉय, एल्सी जॉय, मुख्याध्यापक सारंग, प्राथ विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर, इ मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रशालेतील कला शिक्षक चैत्यन्य भाट, हेमंत कुडवस्कर व सहा. शिक्षक अनिल सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg