loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने चिपळूणमध्ये शोक, दुकाने बंद

चिपळूण (वार्ताहर) - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने चिपळूण शहरात शोककळा व्यक्त होत आहे. आज दुपारनंतर व्यापार्‍यांनी चिपळूण शहरात कडकडीत बंद पुकारून अजितदादांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचा अनेकांना धक्का बसला. सर्वसमावेशक राजकीय नेता म्हणून अजितदादा लोकप्रिय होते. सामान्य कार्यकर्त्यापासून सामान्य जनतेपर्यंत त्यांनी आपला संपर्क ठेवला होता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलबजावणी येताना या योजनेसाठी अजितदादांनी आर्थिक तरतूद केली.त्यामुळे महिला वर्गामध्येही अजितदादांविषयी विशेष आस्था असल्याचे दिसून आले. आज सोशल मिडीयावर देखील अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. इतकेच काय तर व्हॉटस्‌अपवर स्टेटस देखील अनेकांनी ठेवल्याचे दिसून आले. सर्व जातीधर्मामध्ये लोकप्रिय असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतींना चिपळूणमधील जनतेने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg