loader
Breaking News
Breaking News
Foto

अजितदादांच्या आईला कळू नये म्हणून काळजी घेतली , लेकाला भेटायला चालतच निघाल्या, फार्महाऊसवरील मनाला चटका लावणारा प्रसंग

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्यातच आता अजित पवारांच्या फार्म हाऊसवरून मनाला चटका लावणारी माहिती समोर आली आहे. दादांच्या फार्म हाऊसवरील व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी अजित पवारांच्या आईसंदर्भात माहिती दिली आहे. संपत धायगुडे यांनी सांगितले की, सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई फार्म हाऊसवरती टीव्ही पाहत होत्या. त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर येत होती. आईंनी लगेच आम्हाला विचारले 'अरे दादांचा अपघात झालाय का?' पण आईलाही वाटले त्यांना खरचटले असेल काही झाले नसेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ढे संपत धायगुडे सांगतात की, बारामतीत हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची टीव्हीवरून बातमी आली. त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत, यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकून दिला. काही झाले नसल्याचे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दादांना भेटून येऊ चला असे म्हणून त्या फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या होत्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचेही सांगितले. पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी नाईलाजाने त्यांना आम्ही बारामती येथील बंगल्यावर घेऊन गेलो, अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच चार दिवसांपूर्वी अजितदादा त्यांच्या फार्म हाऊसवर आईला भेटण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी साडेसात वाजता ते फार्महाऊसवर आले होते. आईसोबत त्यांनी तब्बल पाऊण तास गप्पा मारल्या. त्यानंतर शेतातील सर्व कामगारांना कामाच्या सूचना दिल्या. शेतात नवनवे वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना केल्या. कर्मचाऱ्यांची आपुलकीने विचारपूस करून ते पुढील कार्यक्रमासाठी गेले, असेही संपत धायगुडे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg