खेड (प्रतिनिधी) - सहयाद्रीच्या राकट उपरांगातून वाट काढत तालुक्यातील किल्ले रसाळगड गाठणं हे मुळात धाडसाचच काम. पण दृष्टी नसताना देखील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले रसाळगडाचा इतिहास, निसर्ग आणि रोमांच मनाने अनुभवण्याचे धाडस ८० दृष्टीहिन बांधवांनी पूर्ण करत 'डोळस' ट्रेकिंग सफर केली.
दिव्यांगस्नेही उत्तमकुमार जैन यांच्या संवेदनशील संकल्पनेतून खेड महाराजा प्रतिष्ठान व नयन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनोख्या ट्रेकिंग सफरीचे आयोजन करण्यात आले होते. रसाळगडाचा इतिहास स्पर्शातून अनुभवताना, महाद्वारापाशी उभं राहताना अन् व्याख्यानातून ज्ञान घेताना या सगळ्या क्षणात शिवछत्रपतीच्या मावळ्यांची जणू ऊर्जा संचारल्याची भावना सहभागी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. चंद्रशेखर साळुंखे यांनी वन्यजीव, पर्यावरण, सर्पजीव, विज्ञान यावर व्याख्यान दिले. डॉ. विलास शेळके यांनी प्रथमोचाराबाबत मार्गदर्शन केले. महाराजा प्रतिष्ठानचे प्रणव म्हापुसकर यांनी दिव्यांग बांधवांना गडाविषयी माहिती दिली. दिव्यांगस्नेही उत्तमकुमार जैन यांनीही दृष्टीहिनांशी मोकळा संवाद साधला. येथील संतोष मालशे यांनी संपूर्ण गडावर सफर करत चिकाटीचे दर्शन घडवले. सामुहिक मनोरंजन, गाणी, गप्पा, महाराष्ट्र गौरव गीते आदींनी रंगलेल्या कार्यक्रमानंतर सहभागी दिव्यांग बांधवांना सन्मानपत्र देण्यात आले.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महाराजा प्रतिष्ठानचे प्रणव म्हापुसकर, आकाश बैकर, नरेंद्र जाधव, एस. जी. शिर्के, आखाडे, उमेश भोसले, पाटणे, महिला स्वयंसेविका कल्पना जैन, निर्मळ, बनी जैन आदींनी विशेष मेहनत घेतली. नयन फाऊंडेशनचे पुनलागार देवेंद्र, ओंकार चव्हाण यांनी सफरीचे नियोजन केले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.