बारामती - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अखेरचा निरोप देताना लाखोंचा जनसागर हळहळला. अजितदादांच्या पार्थिव देहाला अंत्यदर्शनासाठी जेव्हा ठेवण्यात आले तेव्हा माजी कृषी व संरक्षणमंत्री शरद पवार आले. ते पूर्णतः हळहळले. त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. शरद पवार यांना वैयक्तिक मोठा धक्का म्हटला जात आहे. खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना शरद पवार यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली.
काल बारामती विमानतळावर विमानाचे लँडींग होत असता विमानाला अपघात होऊन अजितदादांसह सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. आज बारामतीत सकाळपासूनच लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात अनेक राजकीय नेते उपस्थित होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुशिलकुमार शिंदे, राजे छत्रपती यांच्यासह चंद्रकांतदादा पाटील, सुनिल तटकरे तसेच आमदार, खासदार यांची उपस्थिती होती. जेव्हा अजितदादांच्या कुटुंबियांनी पार्थिव देहाचे शेवटचे दर्शन घेतले तेव्हा बारामतीकरांनी अक्षरशः हंबरडाच फोडला कारण आपल्या बारामतीचा लाडका नेता आज आपल्यातून गेल्याची भावना या अथांग महासागरात उमटली.
अजितदादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून दोन दिवसांचा दुखवटा शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहर व गावातून अजितदादा पवार यांच्या निधनाने श्रद्धांजली म्हणून बाजारपेठा बंद करण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्र जणू दुःखाच्या सागरात बुडाला. दादांसारखे सर्वसमावेशक नेतृत्व पुन्हा जन्माला येणार नाही, अशी भावना सामान्य जनतेतून व्यक्त करण्यात आली. अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला निरोप देताना लाखोंचा महासागर गहिवरला आणि अश्रूंचा बांध फुटला.


















































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.