वेळणेश्वर (उमेश शिंदे) - वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात यावेळी राजकीय लढत कमालीची रंगतदार ठरणार असून निवडणूक थेट अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर पुन्हा एकदा रिंगणात उतरल्या असून त्यांना थेट टक्कर देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सिद्धी रामगडे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.
नेत्रा ठाकूर या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. जिल्हा नियोजन समितीवर त्यांनी केलेले काम विकासकामांबाबतचा अनुभव आणि प्रशासकीय जाण यामुळे त्यांची प्रतिमा काम करणारी नेत्या अशी आहे. विकासकामांचा ठोस अनुभव हा नेत्रा ठाकूर यांचा मोठा प्लस पॉइंट मानला जात असून शिंदे गटाकडून त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे शिवसेनेकडून सिद्धी रामगडे या नव्या दमाच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या असून त्यांना स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुण मतदार, महिलांचा पाठिंबा, उच्च शिक्षित आणि ठाकरे ब्रँडवरील विश्वास यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होत चालली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू असून वेळणेश्वर जि. प. गटातील ही निवडणूक संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. अनुभव विरुद्ध नव्या नेतृत्वाची ही लढत कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.