साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रियेत 'नोटा'हा एक अधिकृत पर्याय असल्याने कोणत्याही मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध घोषित करता येणार नाही, असा पवित्रा घेत ९५-कोलझर पंचायत समिती मतदारसंघातील निवडणुकीबाबत दोडामार्ग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ९६-मणेरी मतदारसंघातील उमेदवार दीपक बुधाजी जाधव यांनी हा अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील ९५-कोलझर पंचायत समिती मतदारसंघात सध्या एकच उमेदवार रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली आहे. मात्र, दीपक जाधव यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, बॅलेट पेपरवर 'नोटा' हा सुद्धा एक अधिकृत पर्याय म्हणून उपलब्ध असतो. जर मतदारांना समोरचा उमेदवार मान्य नसेल, तर त्यांना 'नोटा' दाबण्याचा लोकशाही अधिकार आहे. जर निवडणूक न घेता थेट 'बिनविरोध' घोषित केले, तर मतदारांचा 'नोटा' वापरण्याचा अधिकार हिरावला जातो. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 'नोटा'ला सर्वाधिक मते मिळाल्यास फेरनिवडणूक घेण्याची तरतूद आहे, याचाच अर्थ 'नोटा' हा निवडणुकीतील एक सक्रिय घटक आहे . त्यामुळे कोळझर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रीतसर पार पाडावी आणि ती बिनविरोध घोषित करू नये, अशी आग्रही मागणी जाधव यांनी केली आहे. आता या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात आणि 'बिनविरोध' निवडीच्या तांत्रिक प्रक्रियेत 'नोटा'च्या मुद्द्यामुळे काही बदल होतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.