loader
Breaking News
Breaking News
Foto

कारवांचीवाडीत ३, ४ फेब्रु. रोजी स्वयंभू श्री भराडीन देवीचा यात्रोत्सव

रत्नागिरी (वार्ताहर) - पोंमेंडी बुद्रुक येथील कारवांचीवाडी येथे वसलेली स्वयंभू, जागृत, नवसाला पावणारी स्वयंभू श्री आई भराडीन देवीचा यात्रा उत्सव दि. ३ व ४ फेब्रुवारी २०२६ या दिवशी मोठया उत्साहात संपन्न होणार आहे. या यात्रा उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दोन अंकी सामाजिक नाटक ‘तूच माझी अर्धांगिणी’ हे नाटक होणार आहे. दि. ४ रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ओठी भरणे व नवस फेडणे असे कार्यक्रम होतील. सकाळी ८ वाजल्यापासून विविध भजणे होतील. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दुपारी ३ वाजल्यापासून हळदी-कुंकू कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्यासाठी श्री स्वयंभू भराडीन देवी उत्सव कमिटीचे कार्यकर्ते ३ महिन्यापासून तयारी करत आहेत. या उत्सवाला भविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg