शृंगारतळी (जाहिद मुजावर) - जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर कोकणच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, शृंगारी मोहल्ला येथील तरुण विद्यार्थिनी नजारिया साल्हे हिने रशियामध्ये पाच वर्षे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, भारतातील NBEMS परीक्षा उत्तीर्ण होऊन MBBS पदवीवर आपले नाव कोरले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गुहागर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. शृंगारी मोहल्ल्यातील या कन्येने रशिया येथे सलग ५ वर्षे राहून वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. परदेशातील शिक्षण संपवून भारतात आल्यावर 'नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स' NBEMS द्वारे घेतली जाणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. काल लागलेल्या निकालात तिने या परीक्षेत यश संपादन करून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकारले.
या यशामागे तिचे वडील रमजान साल्हे यांची प्रचंड मेहनत आणि त्याग आहे. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, या जिद्दीने त्यांनी तिला पूर्ण पाठबळ दिले. या यशाबद्दल डॉ. नजारिया साल्हे यांनी सांगितले की, "माझ्या या प्रवासात वडील रमजान साल्हे, आई आणि भाऊ या संपूर्ण कुटुंबाचा खंबीर पाठिंबा होता. त्यांच्या विश्वासामुळेच मी आज हे यश प्राप्त करू शकले." तिच्या या यशाची बातमी समजताच शृंगारतळी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पाटपन्हाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच आसीम साल्हे यांनी डॉ. नजारिया चे विशेष अभिनंदन केले असून, तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातील मुलीने परदेशात जाऊन आणि भारतात येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन केले जात आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.