loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव जि. प. भाजपाचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पं. स. उमेदवार सचिन बिर्जे यांच्या प्रचारचा शुभारंभ

सावंतवाडी - माजगाव आणि वेत्ये या दोन्ही गावचे नाते हे आगळेवेगळे आहे. त्यामुळे हे नांत टिकविण्याचे काम वेत्येवाशिय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीतून दाखवून देतील, असा विश्वास विक्रांत सावंत यांनी वेत्ये येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला. माजगाव जिल्हा परिषदेचे भाजपाचे उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांनी वेत्ये गावची ग्रामदेवता देव कलेश्वर पुर्वी देवी यांना नारळ ठेऊन आपल्या प्रचारचा शुभारंभ केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मोठ्या संख्येने गावचे मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सावंत म्हणाले, वेत्ये आणि माजगाव या दोन्ही गावाचे नाते हे आगळेवेगळे आहे. इथल्या ग्रामस्थांनी नेहमीच माजगावावर अतूट प्रेम केले आहे. हेच प्रेम माझ्यासह पंचायत समिताचे उमेदवार सचिन बिर्जे यांना या निवडणूकीतून इथले ग्रामस्थ निश्चितच देतील आणि दोघांना भरभरुन मतदान करुन विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी सरपंच गुणाजी गावडे म्हणाले, जिल्हा परिषदेसाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र विक्रांत सावंत व माझी असलेली मैत्री पाहता मित्रत्वासाठी ही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पुढील दिवसात सपुर्ण माझगाव मतदारसंघ पिंजून काढून आपण विक्रांत सावंत व सचिन बिर्जे या दोंघाना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी नरेद्र मिठबांवकर यांच्यासह अनेक मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg