loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगर परिषदेची पहिलीच सभा वादळी

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत पहिलीच मासीक सभा पार पडली. या सभेमध्ये गेल्या ४ वर्षांतील प्रशासकीय कारभाराचे पदाधिकार्‍यांनी वाभाडे काढले. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी शहरातील स्वच्छ भारत अभियानात उभारण्यात आलेल्या शौचालयांचा ४ कोटींचा घोटाळा निदर्शनास आणून दिला. तर नगरसेवक निमेश नायर यांनी महानगर गॅसने खोदाईच्या पैशात केलेला ३० लाखांचा घोटाळा समोर आणत नगराध्यक्षांसमोर प्रश्‍न उपस्थित केला. या सर्व घोटाळ्यांची कसून चौकशी करण्यात येईल असे आश्‍वासन नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी नगर परिषदेची बिकट अर्थिक परिस्थिती पाहता आम्हाला मासिक सभेच्या बैठकीचा हप्ता सुद्धा देवू नका असे नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी घोषित केले. यालाच जोड देत बैठकीत आम्हाला चहापाणीसुद्धा नको, असे नगरसेवक राजू कीर यांनी सांगितले. एकूणच नगरपालिकेची पहिली मासिक सभा, प्रशासनाचा कारभार, घोटाळे आणि आरोप प्रत्यारोप यामुळे वादळी ठरली. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभावर आक्रमक पवित्रा घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg