केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील मठ आरोग्य उपकेंद्रातील नागरिकांना पुरविण्यात आलेल्या विविध सेवा व सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी करून राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे खास कौतुक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी करून या उपकेंद्राला जिल्हा परिषदेच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन खास अभिनंदन करण्यात आल्याने या मठ आरोग्य उपकेंद्राचे तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. तालुक्यातील जावडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र मठ ता.लांजा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान अंतर्गत अचानक भेट देऊन आरोग्य विषयक कामकाज व उपकेंद्र यांची पाहणी केली होती.
उपकेंद्रातील प्रसूतीगृह, लसीकरण कक्ष, हर्बल गार्डन यांची पाहणी केली. उपकेंद्र IEC, उपकेंद्र अंतर्गत व बाह्य स्वच्छता तसेच आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम उपकेंद्रस्तरीय झालेल्या कामाचा आढावा घेऊन कुटुंब कल्याण उद्दिष्ट 140%, HPV लसीकरण 100%, उपकेंद्रात 1 प्रसूती, राष्ट्रीय कार्यक्रम उद्दिष्ट पूर्तता, उपकेंद्रस्तरीय रेकॉर्ड परिपूर्ण अद्यवत ठेवले बाबत समाधान व्यक्त करून उपकेंद्राला appreciation certificate दिले. या संपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण उपक्रमशील आरोग्य सेविका व उपकेंद्राच्या प्रमुख अरुणा वाघाटे यांनी उत्तमप्रकारे केले व त्याला सर्व कर्मचारी यांनी देखील साथ दिली. हे सादरीकरण व प्रत्यक्ष काम पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे भारावून गेल्या व यावेळी त्यांनी अरुणा वाघाटे यांचे कौतुक करून शुभेच्छा देखील दिल्या.
सदर सर्टिफिकेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून नुकतेच लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एच.बी.गिरी यांचे हस्ते जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री हेडाऊ तसेच मठ उपकेंद्र प्रमुख अरुणा वाघाटे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक विश्वजीत काळे, अंजली गोरे, आझाद विचारे, प्रज्ञा कदम, विवेकानंद नाईक आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मठ उपकेंद्राचे लांजा तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.