केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील पुनस, चाफेट, वेसुर्ले, हरचेरी आदी गावातील विविध मराठी शाळांमध्ये माणुसकीची भिंत प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने पालक व तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे. माणुसकीची भिंत प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या वतीने तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पुनस तसेच जिल्हा परिषद शाळा चापेट नेमणवाडी, वेसुर्ले शाळा, पुनस मराठी शाळा, हरचेरी मराठी शाळा आदी विविध मराठी शाळेतील शेकडो होतकरू हुशार व गरीब विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वतीने मोफत गणवेश, दप्तर, वहया, कंपास पेटी, आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच गेली अनेक वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवून संस्थेने माणुसकीची भिंत हे आपले नाव सार्थकी लावले असल्याचे तालुक्यातून बोलले जात आहे.
या आठवडाभर चाललेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्युनसिपल कार्पोरेशन मुंबई बँकेच्या संचालिका संध्याताई बापेरकर, पुनस गावचे सरपंच संतोष लिंगायत, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष काशिनाथ कांबळे, कार्याध्यक्ष दिपाली कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संपदा म्हादे, गावप्रमुख वसंत नेमन, वेसुर्ले शाळेचे मुख्याध्यापक सुनील यादव, चापेट शाळेचे मुख्याध्यापक उमाशंकर जाधव, पुनस हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र कल्लोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी असलेल्या संध्याताई बापेरकर यांनी माणुसकीची भिंत या संस्थेचे कौतुक करून कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा हेतूने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत करीत जे शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे हे निश्चित कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढीसाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला व संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



















































































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.