loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे जिल्हा परिषद गटातील विलास चाळके यांची मुसंडी

देवळे (प्रकाश चाळके) - दाभोळे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विलास चाळके त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी जोरदार सुरू असून कार्यकर्त्यांच्या सभांमध्येच प्रचंड गर्दी होत आहे. या सभेचा अंदाज घेता विलास चाळके यांना रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान होणार असे एकूण चित्र आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटातील साखरपा व दाभोळे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या या दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या मतदारसंघात तीनही उमेदवार प्रचंड मताधिक्य घेतील असे म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विलास चाळके यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीत जुने आणि नवीन असे दोन्ही कार्यकर्ते एका ठिकाणी येत असून सर्वांचा एकच निर्धार विलास यांना जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान करून आमदार भैय्या सामंत यांचे हात मजबूत करणे हाच उद्देश असल्याने सर्वच कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. सर्वच समाजातील कार्यकर्ते मनापासून काम करत असल्याने या मतदारसंघात तीनही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार याची खात्री सर्वच वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मतदानाच्या वेळी आलूते बलुते येऊन मत मागतात. अशा निवडणुका जिंकता येत नाहीत, असे सर्व कार्यकर्ते बोलले. मतदार संघात रस्ते, पाणी, वैद्यकीय, शैक्षणिक, अशा विकास आणि सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या उमेदवारांना मतदार मत टाकतील यात शंका नसल्याचे सर्वांनीच म्हटले. मात्र रेकॉर्ड ब्रेकिंग मतांसाठी गाफील राहून चालणार नसल्याचे म्हटले.

टाइम्स स्पेशल

यावेळी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीमध्ये दाभोळे येथे विलास चाळके, बापू शेटे, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याणी, संजय सुर्वे, सुर्वे, माजी जि.प. स. रजनी चिंगळे, विलास बेर्डे, संजय कांबळे, हेमंत शिंदे, सुर्वे, प्रसाद अपंडकर, नेत्रा शिंदे, रेश्मा परशेटे, बापू लोटणकर, मनोहर सुकम, काशिनाथ सकपाळ, कृष्णा सकपाळ, शुभम गांधी, पंकज देवळेकर, राकेश सागवेकर, अनंत बसवनकर, लक्ष्मण शिंदे, रवींद्र कामेरकर, रवींद्र कामेरकर, विलास सुकम, प्रमिल चव्हाण, प्रकाश गावणकर, रमेश बेटकर, प्रणित बेटकर, यश कोळवणकर, माणिक पाटील, दीपाली जाधव, प्रदीप जाधव यांच्यासह प्रत्येक गावातील धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg