देवरूख सुरेश सप्रे : संगमेश्वर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गणाच्या निवडणूकीत भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी ही महायुती व उबाठा शिवसेना यांच्यात खरी लढत होणार असून सर्व पक्षिय उमेदवारांचा प्रचार जोरदारपणे सुरु झाला असून १९९२ पासून पंचायत समितीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेत फुट पडल्याने या निवडणुकीत दोन्ही सेनेत अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कोसुंब जिल्हापरिषद निवडणूक लक्षवेधी पण माजी आम. सुभाष बने यांची रणनीती मोठी असल्याचे म्हटले जाते .
तालुक्यातील सर्वात लक्षवेधी व रंंगदार लढाई ही कोसुंब गटात होणार आहे. लढत चौरंगी असेल. तालुक्यात महायुती असली तरी या गटात भाजप व सेनेत मैत्रीपूर्ण लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे नेते माजी आम. सुभाष बने यांचे सुपुत्र युवा नेते व माजी जिप अध्यक्ष रोहन बने व भाजपचे नेते प्रमोद अधटराव तर उबाठातर्फे माजी जिप सदस्या मुग्धा जागुष्टे यांच्यात लढत होणार असली तरी भाजप व सेनेत मैत्रीपूर्ण लढत असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. गत निवडणुकीत रोहन बने यांना अद्रुष्य घड्याळ्याने मदतीचा हात देत मैत्रीचा जागर केलेच चर्चा होती. त्यांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असली तरी गत आठ वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असलेने माजी आमदार सुभाष बने यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे चित्र दिसून येते आहे.
आता तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्षात फुट पडली आहे. तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे. या गटात गत निवडणुकीत १४२५२ मतांपैकी भाजपाचे अधटराव यांनी ४६४६ मते तर सेनेचे बने यांनी ४९६८मते मिळवत निसटता विजय मिळविला होता. राष्ट्रवादीच्या नेहा माने यांनी ३३८४ मत घेतली होती.. या गटात दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. माजी मंत्री रवींद्र माने हे स्वगृही परतले असलेने उबाठाची ताकद वाढली आहे. माजी आम. सुभाष बने हे जातीने प्रचारात उतरले आहेत वाडीवस्तीवर जात प्रचाराची धुरा सांभाळत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या गटातील ही तिरंगी लढत किती लक्षवेधी ठरली आहे हेच दिसून येते आहे. भाजपाचे प्रमोद अधटराव यांच्या प्रचारात संघ स्वयंसेवक उतरले असून त्यांचे वाडीवाडीत शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. त्यामुळेच विरोधक संभ्रमात पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.