loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कालावधीत केलेल्या कामांसह मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून कुंभवे ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी

दापोली (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी कुंभवे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान काळात केलेल्या कामाची गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामपंचायतीची दप्तर तपासणीही केली. दापोली तालुक्यातील कुंभवे येथील ग्राम पंचायत सर्वार्थाने महत्वाची मानली जाते. अशा ग्राम पंचायतीने मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज योजनेत सहभाग घेतला आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान काळात ग्राम पंचायतीने राबवलेले विविध लोकोपयोगी उपक्रम तसेच केलेल्या विकास कामांसह ग्राम पंचायतीची दप्तर तपासणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील वगैरे अधिकारी वर्गाने केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, कुंभवे ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण झाडेकर, माजी सरपंच अनंत मांडवकर, ग्रामपंचायत अधिकारी स्वस्तिक इदाते, सीआरपी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, जिल्हा परिषद केंद्र शाळा कुंभवे च्या मुख्याध्यापिका ज्योती पवार आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी कुंभवे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या नरेगा अंतर्गत कामांना भेटी दिल्या. विविध प्रकारच्या विकास कामांची पाहणी केली. तसेच कुंभवे गावचे आदर्श शेतकरी अनिल शिगवण यांच्या कलिंगड लागवडीच्या प्रक्षेत्राला भेट देऊन त्यांच्या कृषीविषयक लागवडी विषयक माहिती जाणुन घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत कुंभवे चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ तसेच कुंभवे कार्यक्षेत्रात शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना ग्राम पंचायतीच्या गुणांकन वाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg