संगमेश्वर (बुरंबी) - येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबईचे वतीने दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये वार्षिक चित्रकला व रांगोळी प्रदर्शन २०२६ आयोजन केले गेले. या प्रदर्शनास रत्नागिरी जिल्हा प्राथमिक व योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी विजय परीट, शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी नाईक उपस्थित होते. या प्रदर्शनाम्ध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, पोट्रेट रांगोळी व हस्तकला पाहून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विशेषतः इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला ओंकार रामाने, इयत्ता ९ वी मधील सार्थक रामाने तसेच शालेय विद्यार्थी अब्दुल शेख, तन्मय चव्हाण, जाई कदम, श्रद्धा पंडीत, त्रिवेश बाचम यांनी काढलेली निसर्ग चित्रे व पोट्रेट रांगोळी तसेच मुक्त विषय रांगोळी मान्यवरांच्या कौतुकास पात्र उरली. तर मिहिर मुळ्ये यांनी बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था विद्या संकुल असलेली दादासाहेब सरफरे विद्यालय इमारत प्रतिकृती सर्वांच्याच पंसतीस पात्र ठरली. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ओकार रामाने यांनी काढलेली कोकणची खास ओळख असलेली चारसोपी कौलारु घरे व घराच्या मागील बाजूची परसबाग, घराजवळ असलेली शेतीपुरक साहित्य, वर्तमानपत्राच्या कागदामध्ये असलेला वडापाव, शेत खेकडे ही चित्रे पाहून शिक्षणाधिकारी लोहार यांनी ओंकार रामाने याची पाट थोपटली व तु उत्कृष्ट चित्रकार बनशील अशी श्गाबासकी दिली. तर मिहिर मुळ्ये यांनी हुबेहुब तयार केलेली शाळा इमारत प्रतिकृती पाहून मिहीर मुळ्ये याचे खुप कौतुक केले.
यावेळी त्यांनी शिक्षक संस्था संचालक सभेत संबोधताना, "संस्थेनी दिलेली इमारत सुविधा प्रशालेच्या प्रगतीस कारण असून आज प्रशालेच्या कलादालनामध्ये संस्थेच्या कल्पकतेने विद्यालयाच्या वतीने कला दालनामध्ये वार्षिक चित्रकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कला गुर्णाना एक छान व्यासपीठ मिळालेले आहे. प्रशालेचे कला शिक्षक प्रदीप शिवगण यांनी छान मार्गदर्शन केलेले दिसून येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मला विद्यार्थ्यांनी छान काढलेली चित्रे मला पहावयास मिळाली. मला सुद्धा चित्रकलेची खूप आवड आहे. माझ्या विद्यार्थी दशेतील रंगपेटी, रंगकुपी व ब्रश आजही माझ्या घरी जतन आहेत. या प्रदर्शनात विद्याथ्यांनी निसर्ग चित्रे काढताना केलेली सुक्ष्मनिरिक्षणे, रंगसंगती, यामुळे व्यवसायिक चित्रकाराल्ही लाजवतील अशी चित्रे मला पहावयास मिळाली. विद्यार्थ्यांनी फक्त चित्रे न काढता या चित्रांच्या विक्रीतून स्वावलंबी बनावे. जेणेकरून आणखी नाविण्यपूर्वक कल्पकतेतून उत्तम चित्र निर्मिती होईल व विद्याथ्यांच्या चित्रास योग्य मोबदला मिळेल. यासाठी संस्थेने दरवर्षी चित्र प्रदर्शन भरवावे." असे सांगितले.
यावेळी संस्थेच्या वतीने संस्था उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई व संस्था संचालक व श्गाळा समिती अध्यक्ष दिनेश शामाराव जाधव, प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर यांनी शाळा व संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी लोहार यांचे स्वागत केले. संस्था संचालक व शालेय शिक्षक यांचेशी संवाद साधताना शिक्षणाधिकारी लोहार यांनी शालेय प्रगती व संस्थेनी पुरविलेल्या भौतिक सुविधा पाहून कौतुक केले. तर प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका स्वरा शिंदे यांनी लालित्यपुर्वक सूत्रसंचालन केलेबद्दल त्यांचे आवर्जुन कौतुक केले. तीन दिवसीय या प्रदर्शनासाठी संस्था अध्यक्ष दिलीप रावजी मोरे, उपाध्यक्ष, विक्रांत जाधव, सरचिटणिस शरद गोविंद बाईत व खजिनदार महेश जनार्दन जाधव स सर्व संस्था संचालक यांनी दिलेल्या संदेशात सहभागी विद्याथ्यांचे कौतुक केले व पुर्ण प्रदर्शन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.