loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत उद्या अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या, रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील आर. पी. डी. हायस्कूलच्या हॉलमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ​याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी माहिती दिली आहे. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सावंतवाडी शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजू परब यांनी समस्त सावंतवाडीकरांच्या वतीने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg