loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित, छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल, जामगे, ता. खेड, जि. रत्नागिरी या प्रशालेत ७७ वी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात व शिस्तबध्द वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संस्था अध्यक्षा ज्योती रामदास कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामुहिक ड्रिल व परेडचे संचलन सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट संचलनामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण विद्यार्थ्यांनी मल्लखांब, धनुर्विद्या (आर्चरी) व अडथळा शर्यत (ऑब्स्टॅकल्स) यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे प्रात्यक्षिक सदर कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरले. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांची शारिरीक क्षमता, शिस्त, धैर्य व आत्मविश्वास यांचे सुंदर दर्शन घडले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत साक्षरतेची शपथ घेतली. या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय क्रिडा, कला, सांस्कृतिक व शैक्षणिक विभागाअंतर्गत विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था व प्रशालेच्या वतीने मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव व सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रामदास कदम, मा. जिल्हा परिषद सदस्य अरूण उर्फ चंद्रकांत कदम, संस्था खजिनदार काशिराम सकपाळ, प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन, प्राचार्य डॉ. खोत, जामगे सरपंच देविका जाधव, आंबये सरपंच शालिनी जाधव व इतर मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालकवर्ग व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg