संगमेश्वर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण तापले असताना प्रत्येक पक्षाकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कसबा जिल्हा परिषद गटातील परचुरी पंचायत समिती गणात शिवसेनेतर्फे कोंडये येथे खाडी विभागातील महिलांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास खाडी विभागातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी खाडी विभागात राबवलेल्या विविध विकासकामांमुळे हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला बनला असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कसबा मतदारसंघात रचना महाडीक यांनी यापूर्वी केलेल्या विकासात्मक कामांमुळे त्या मतदारांमध्ये परिचित असून, जिल्हा प्रशासनाचा दांडगा अनुभव, लोकांशी असलेली जवळीक व कार्यकर्त्यांची भक्कम फळी यामुळे शिवसेनेची या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याचे चित्र दिसून येत आहे. मेळाव्यात उपस्थित महिलांनी उमेदवार रचना महाडीक व पंचायत समिती उमेदवार शर्वरी वेल्ये यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करू, असा विश्वास महिलांनी घोषणांतून व्यक्त केला. महिलांच्या जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. हा महिला मेळावा उमेदवार रचना महाडीक, पंचायत समिती उमेदवार शर्वरी वेल्ये तसेच महिला विभाग प्रमुख पूनम महेश देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान, खाडी विभागातील पुरुष पदाधिकाऱ्यांचीही स्वतंत्र बैठक संपन्न झाली. या बैठकीस विभागातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावात जोमाने प्रचार करण्याचा व दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीस शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, विभाग प्रमुख महेश देसाई, परशुराम वेल्ये, मनमोहन देसाई योगेश मुकादम, सचिन मांजरेकर, दिनेश शितप, अशोक पांचाळ, भारती धामणे, जयंत देसाई, विश्वास घेवडे, सुदर्शन मोहिते, समीरा खान, संतोष देसाई, मारुती कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.