loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी-आडे-उटंबर परिसरात मासेमारी बंद, मच्छीमार मेटाकुटीस

दापोली (मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी, आडे, उटंबर आदी परिसरात हवामानाचा बदल झाल्यामुळे या परिसरातील मच्छीमार बांधव आपल्या छोट्या मोठ्या बोटी गेले 15 ते 20 दिवसापासून खाडीत नागर टाकून बोटी ठेवल्या आहेत. या बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार बोटी आहेत. अधिक वृत्त मिळते की मासेमारी सुरू झाल्यापासून नैसर्गिक आपली पिच्छा सोडत नाही त्यामुळे मच्छीमारांकडून मासेमारीला अद्याप वेग आला नाही असे कळते. बदलत्या वातावरणाचा फटका येथील मच्छीमारांना बसला आहे. त्यामुळे आडे उटंबर केळशी आधी परिसरातील बंदरातील मच्छीमारी पूर्ण बंद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे येथील मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्यामुळे येथील मच्छीमार बांधव मेटाकुटीस आल्याचे कळते. येथील मच्छीमार बांधव म्हणाले. शिवाय एका बोटीवर 5 ते 7 कामगार काम करत असतात. मालकाला काहीच फायदा होत नाही या 5 ते 7 कामगारांना पगार कोठून द्यावा. यांच्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. या खराब हवामानामुळे मच्छी मिळत नसल्याने मच्छीमार बांधवांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळे मच्छीमार बांधव आडे समुद्रकिनारी बसून नशिबाला हात लावून बसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे येथील मच्छीमार मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे आपला कुटुंब कस सांभाळायचा असा प्रश्न पडला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg