इश्वरपूर. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. शरद पवारांनंतर जयंत पाटील यांनीही अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांबाबत भाष्य केले आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. दोन्ही गटाच्या अनेक बैठकाही पार पडल्या होत्या. सर्व काही ठरले होते. १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणाही होणार होती असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यास अजित पवार सरकारमध्ये राहणार होते का, या प्रश्नावर जयंत पाटलांनी मौन बाळगले.
अलीकडच्या काळात अजितदादा बऱ्याच वेळा माझ्या घरी आले होते. त्यांची माझी चर्चा झाली होती. बऱ्याच वेळेला ते संध्याकाळी येऊन जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहेत. जे माझ्या बद्दल जनमानसात आहे, ते पुसून मी पुन्हा साहेबांसोबत एकत्र यायला तयार आहे. त्यांचा आग्रह होता. एकदा नाही जवळपास 8 - 10 वेळा बैठका झाल्या. आणि बैठकीचे ठिकाण माझं घरच होतं. पहिल्या दोन चार बैठका तर त्यांनी त्यांच्या भावनाच व्यक्त केल्या. त्यांना साहेबांबद्दल प्रचंड आदर होता. जे झालं ते विसरून आपण एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंघ करू, ही त्यांची अंतिम फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती.
16 तारखेला माझ्या घरीच पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह त्यांची बैठक झाली. यापूर्वी देखील अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, पक्षांच्या अध्यक्षांसह बैठक झाली. 16 ला सगळेच एकत्र होतो. त्यात ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढू. निवडणुकीच्या निकालानंतर जयंत पाटील ठरवतील ती तारीख जाहीर करू असे ते म्हणाले. आम्ही 12 तारीख आम्ही निश्चित केली. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही सहज गमतीत म्हटले की, आपण बारामतीला शरद पवार साहेबांना भेटायला विमानाने जाऊ. आम्ही ज्याला फोन केला तो म्हणाला की ती धावपट्टी लहान आहे, माझे विमान काही तिथे उतरणार नाही. मग आम्ही गाडीने निघालो आणि सकाळी आठ वाजता पवार साहेबांच्या समोर बसलो. तिथे सविस्तर चर्चा झाली. 12 तारीख आम्ही सर्वांनी निश्चित केली.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.