loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी - धामणंद फाटा येथे गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

खेड - तालुक्यातील खोपी - धामणंद फाटा येथे विक्री करण्याच्या उद्दे‌शाने गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई दि.३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खोपी - लाडवाडी येथील कृष्णा अनंत साळुंखे (वय- ४९ वर्षे) या संशयित आरोपीने खोपी - धामणंद फाटा येथे गैरकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची १०००/- रुपये किंमतीची १० लिटर दारू विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळून आला. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितीन रामदास चव्हाण यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार संशयित आरोपी कृष्णा अनंत साळुंखे याच्याविरोधात दि. ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:३२ वाजता गुन्हा रजि.' नं. २१/ २०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg