loader
Breaking News
Breaking News
Foto

कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून साक्षी देसाई यांना वाढता पाठिंबा

तिलारी (प्रतिनिधी) - कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या साक्षी देसाई यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. गावभेटी, थेट जनसंवाद आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी प्रचाराला गती दिली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्या सातत्याने गावोगाव भेटी देत असून महिलांचे प्रश्न, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य सुविधा आणि ग्रामविकासाशी संबंधित मुद्दे प्रचारात मांडत आहेत. तरुण नेतृत्व म्हणून मतदारसंघात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रचारादरम्यान बोलताना साक्षी देसाई म्हणाल्या, “कोणताही दबाव कितीही असला तरी मी दहशतवादाला किंवा दबावाच्या राजकारणाला कधीही भीक घालणार नाही. जनतेच्या विश्वासावर आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहूनच मी काम करणार आहे.” अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना कोणत्याही पक्षीय राजकारणापेक्षा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक कारभार, प्रामाणिक प्रशासन आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या प्रचार सभांना आणि बैठकींना नागरिकांची उपस्थिती वाढत असून कोनाळ मतदारसंघात निवडणूक वातावरण अधिक सक्रिय झाले आहे. आगामी काळात विकासात्मक मुद्द्यांवर आधारित प्रचार करत मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा निर्धार साक्षी देसाई यांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg