चिखलगाव - दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांची उपस्थिती लाभली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर उपस्थित होते. तसेच ग्रुप ग्रामपंचायत (देवके-किन्हळ-चिखलगाव) चे सरपंच व संस्थेचे विश्वस्त दिनेश आडविलक, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश नाचणेकर, आयबीटी विभाग प्रमुख शैलेश खुळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे यांनी कले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव केला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान आयोजित विविध स्पर्धा, उपक्रम व परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या इयत्ता पहिली ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मेडल व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व अभिमान कार्यक्रमाची शोभा वाढवत होता.
प्रमुख पाहुणे डॉ. राजा दांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत सातत्य, परिश्रम व शिस्त या यशाच्या गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. तसेच दिनेश आडविलकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सिया झगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदित्य रढे यांनी केले. सांस्कृतिक विभागातर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व स्टाफसाठी स्नेहभोजनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.
































































































































.jpg)










































































































































































































































































.jpg)























































































































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)



























































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.