loader
Breaking News
Breaking News
Foto

​निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद गावडेंची आमदार निलेश राणेंनी घेतली भेट; सांत्वन करत दिली सन्मानाची ग्वाही

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेल्या तीस वर्षांपासून खासदार नारायण राणे यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या निरवडे येथील निवासस्थानी भेट घेतली. उमेदवारी न मिळाल्याने आणि अपक्ष अर्ज मागे घेताना भावूक झालेल्या गावडेंची नाराजी दूर करण्यासाठी राणे यांनी ही भेट घेतल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमोद गावडे यंदाच्या निवडणुकीत तळवडे मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षाची शिस्त आणि नेत्यांवरील निष्ठेपोटी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. यावेळी संवाद साधताना "प्रामाणिक कार्यकर्त्याला राजकारणात किंमत उरली नाही का?" अशी भावना व्यक्त करत त्यांना अश्रू अनावर झाले होते.

टाइम्स स्पेशल

समर्थकाची ही अवस्था पाहून आमदार निलेश राणे यांनी शनिवारी रात्री तातडीने निरवडे येथे जाऊन गावडेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. निलेश राणे यांनी गावडेंशी चर्चा करत त्यांचे सांत्वन केले. प्रदीर्घ काळ सोबत असलेल्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही यावेळी राणेंनी दिल्याचे समजते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर होण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg