loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात १०९ कर्मचाऱ्यांनी केले मतदान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांनी शनिवारी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण याठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिले मतदान केले. यासाठी नाट्यगृह याठिकाणी खास मतदान कक्ष स्थापन करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावर अधिकारी म्हणून नियुक्त असल्याने त्यांना टपाली मतदानाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आला होता. १२४ पैकी १०९ कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी निर्णय अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg